देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय . परंतु देशापुढे अनेक आव्हाने आहेत
१५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाला स्वातंत्र्य होवून ७५ वर्ष पुर्ण होत आहेत . परंतु शहिदांच्या स्वप्नातील देश साकार झालेला नाही . लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी चळवळीने देशात प्रचंड असंतोष निर्माण करून अनेक भारतीयामध्ये बलीदानाची भावना तयार केली ; १८५७ च्या राष्ट्रीय उठावाच्या भारतीय सैनिकामध्ये प्रचंड असंतोषाचे कारण म्हणजे बंदुकीच्या काडतुसामध्ये गायीच्या आणि डुकराच्या कातडीचे आवरण दाताने तोडणे हे १८५७ च्या उठावातील प्रमुख कारण १८५७ साली गोहत्याच्या विरोधात सर्व भारतीय सैनिकामध्ये असंतोष तयार झाला आणि तो इतका अफाट होता की भारतामध्ये लाखो इंग्रजांना मारण्यात आले पण आज देश स्वातंत्र होवुन 74 साल पुर्ण होत आहेत तरीही देशात सर्रासपणे गोहत्या चालु आहे .
म्हणजे खऱ्या अर्थाने शहीद मंगल पांडे यांच्या स्वप्नातील भारत स्वातंञ्य होवून ही साकार झालेला नाही . जेव्हा देशात गोहत्या बंद होईल तेव्हाच शहिद मंगल पांडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल .
गांधीजीच्या १९२० ते १९२२ च्या असहकार चळवळीमुळे इंग्रजाचा सर्व व्यापार ठप्प झाला होता . या असहकार चळवळीमुळे अनेक ठिकाणी इंग्रजांच्या विदेशी कपड्याची होळी करण्यात आली . परंतु या असहकार चळवळीने इंग्रजांना पार हादरुन सोडले . गांधीजींनी भारतीयांना आवाहन केले की तुम्ही फक्त स्वदेशीचाच वापर करा . त्यामुळे अनेक भारतीय स्वदेशीकडे वळले आणि स्वदेशीला चालना मिळाली .
तात्पर्य असे की देशाला स्वातंत्र करण्यामागे स्वदेशी आंदोलनाचा मोठा वाटा आहे परंतु आज देशात हजारो विदेशी कंपन्या देशाची प्रचंड लुटमार करत आहेत . देशातील पैसा विदेशात जात आहे . यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम होत आहे.
भारतीय भाषा इतक्या समृद्ध असताना देखील देशाच्या सर्व सरकारी कार्यालयामध्ये , शैक्षणिक संस्थामध्ये इंग्रजी वापरली जातेय ; ही गोष्ट भारतासाठी फार शर्मनाक आहे . जगातील सर्वात समृद्ध भाषा संस्कृत आहे . सर्व भाषेचे मुळ संस्कृत आहे . हे अजुनही आम्हाला माहीत नाही .
आयुर्वेद ही भारताची हजारो वर्षापुर्वीची मुळ चिकित्सापद्धती असुन पण देशात सर्वात जास्त ॲलोपॅथी सारख्या चिकीत्सा पद्धतीचा गरज नसताना उपयोग होतोय . ॲलोपॅथीमूळे अनेक शारारीक दुष्परीणाम भोगावे लागतात .
आयुर्वेदाबाबत असे म्हणता येईल
लेट पण थेट
कोरोनाच्या काळात सरकारने मद्याची दुकाने चालु ठेवली पण शेतकऱ्याचा साधा भाजीपाला पण सरकारने विकु दिला नाही यावरून येथील सरकारे आपल किती भल करू शकतात हे साबीत झाल . शेतकरी आधीकच तोट्यात चाललाय . याला पुर्णतः सरकारच जबाबदार आहे . हे किती दिवस चालणार ?
राजकारणाचे जातीय समीकरण हे एक देशापुढील मोठे आव्हान आहे यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवुन द्वेष तयार होतायत यामुळे संपुर्ण वातावरण खराब झाले आहे .
हे देशापुढील आव्हाने मांडण्याचा मी थोडासा प्रयत्न केला . आपण वाचकानी या लेखाला भरघोस प्रतिसाद दिला याबद्दल आपला मी मनपुर्वक आभारी आहे.
भारतमाता की जय .
Comments
Post a Comment