देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय . परंतु देशापुढे अनेक आव्हाने आहेत
१५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाला स्वातंत्र्य होवून ७५ वर्ष पुर्ण होत आहेत . परंतु शहिदांच्या स्वप्नातील देश साकार झालेला नाही . लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी चळवळीने देशात प्रचंड असंतोष निर्माण करून अनेक भारतीयामध्ये बलीदानाची भावना तयार केली ; १८५७ च्या राष्ट्रीय उठावाच्या भारतीय सैनिकामध्ये प्रचंड असंतोषाचे कारण म्हणजे बंदुकीच्या काडतुसामध्ये गायीच्या आणि डुकराच्या कातडीचे आवरण दाताने तोडणे हे १८५७ च्या उठावातील प्रमुख कारण १८५७ साली गोहत्याच्या विरोधात सर्व भारतीय सैनिकामध्ये असंतोष तयार झाला आणि तो इतका अफाट होता की भारतामध्ये लाखो इंग्रजांना मारण्यात आले पण आज देश स्वातंत्र होवुन 74 साल पुर्ण होत आहेत तरीही देशात सर्रासपणे गोहत्या चालु आहे . म्हणजे खऱ्या अर्थाने शहीद मंगल पांडे यांच्या स्वप्नातील भारत स्वातंञ्य होवून ही साकार झालेला नाही . जेव्हा देशात गोहत्या बंद होईल तेव्हाच शहिद मंगल पांडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल . गांधीजीच्या १९२० ते १९२२ च्या असहकार चळवळीमुळे इंग्रजाचा ...