मानल तर जीवनात सुख आहे नाही तर जीवन दुःख मय आहे
मी क्लास आटपुन घराकडे निघालो होतो खुप वेळ झाला लक्ष्मी रोडला बसची वाट बघत होतो. इतक्यात मला एक अंध जोडपे दिसले त्यांच्या सोबत त्यांची छोटी मुलगी होती तीचे वय साधरणतः 9 वर्ष असावे आणि ती डोळस होती दिवसभर जमा केलेले पैसे दोघे पती पत्नी मोजत होते आणि मधुन छोट्या मुलीला विचारायचे किती आहेत ? मुलगी बरोबर सांगायची मी हे दृश्य डोळ्याने बघत होतो हे बघुन मी खुप भाविक झालो अंध माणुस खात्री करण्यासाठी अधुन मधुन मला विचारायचा हे किती रुपये आहेत दादा मी त्यांना मदत केली . मुळात मी भावानिक माझा मनमिळाऊ स्वभाव आणि मदतीची भावना ही माझ्यामध्ये कायमच असते मी अडचणीच्या वेळी कायम दुसऱ्याला मदत करतो कदाचित याच कारणाने परमेश्वर मला जीवनत अडचणी देत नसेल .
मी विचार केला परमेश्वराने आपल्याला धडधाकट बनवले आहे . जीवनात डोळा नसल्याने यांची ही दुर्गती झाली होती . पण न डगमगुन जाता हे जोडप स्वाभिमानाने आपल कष्ट करत होत बिचारी त्या अंधाची पत्नी त्याच्या खांद्याला खांदा लावुन त्याला साथ देत होती आपला पतिधर्म निभावत होती हे बघुन मला समजले जीवनात कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या साथीदाराची खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना मी विचारल दादा आपण काय करताय ते बोलले मी कुणाचा फुकट पैसा घेत नाही आमच्याकडे वजन काटा आहे लोक येतात वजन करतात न आम्हाला दहा ५ रुपये त्यातून आमचा उदरनिर्वाह चालतो यातून मी एक शिकलो माणसाने दुःखाची वजाबाकी करावी यातून हे सिद्ध होते आपल्या पेक्षा यांचे दुःख खुप मोठ आहे म्हणून आहे म्हणुन आहेत त्यात समाधान माना सुख मिळेल .
Comments
Post a Comment