मी जवळून अनुभवलेले रूपनर सर
संघर्षातुन माणुस घडतो
*वयाचे २५ वर्ष पुर्ण झाले पण उच्च शिक्षण घेऊन पण नोकरी नाही , घरातील अठरा विश्व दारीद्र , राहायला चांगले घर नाही उच्च शिक्षण घेऊनही पदरी पडलेल अपयश , वारंवार लोकांचे बिनकामी , ऐतखाऊ असे कानी पडलेल अपशब्द मनाला खुप काही सांगुन जात होते मी अपमानाच्या भट्टीत मी जणु भाजुन निघालो होतो , बेरोजगारी आता आई वडिलांनाही घरखर्च झेपेनासा झाला होता , मनाला खुप वेदना होत होत्या घरची गरिबी सहन होत नव्हती आता घर सोडायची वेळ आली होती म्हणुन मोठा संकल्प करून नाईलाजाने २०१६ साली घर सोडावे. लागले आणि थेट पाथर्डी गाठली हाताला काम नव्हते मग आता काय करावे ? हा प्रश्न मनाला भेडसावत होता पण D. ted झाले असल्याने माझा शिक्षकी पेशा होता. अंगचा शिक्षक जागा होता म्हणून स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यासाठी छोटासा क्लास चालु केला मुळात पाथर्डी हा दुष्काळी भाग असल्याने येथील मुलांसमोर स्पर्धा परिक्षा हाच पर्याय होता माझ्या शिकवणीच्या हाथोटीने विद्यार्थ्यात माझ्या बद्दल Respect तयार झाला माझी गणित आणि English Grammer शिकवण्याची पद्धत फार magical होती त्यामुळे मी खुप विद्यार्थ्याचे दैवत बनलो होतो दिवसेदिवस मी विद्यार्थ्यामध्ये फेमस होत होतो . पाथर्डी तालुक्यामध्ये प्रथमच शेकटे भरतीपुर्व प्रशिक्षण चालु झाले होते तेथे मला काम करण्याची संधी मिळाली तिथेही प्रामाणिक पणे सेवा करून विद्यार्थी आणि संस्थापकाचा विश्वास कमावला येथे मला खुप काही शिकण्यास मिळाले इथे ॲकॅडमी व्यवस्थापन शिकलो पण मनात काही तरी करण्याची धडपड होती ती स्वस्थ बसु देत नव्हती म्हणून मी आणि माझे सहकारी प्रा. पडळकर सर येथुन बाहेर पडून स्वतः चे भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र कोरडगाव ता पाथर्डी येथे चालु केले पडळकर सर ZP ला शिक्षक म्हणून नियुक्त झाल्याने मला याचा फार लोड होत असल्याने मी ॲकॅडमी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि अहिल्यानगर येथील गरूडझेप ॲकॅडमी येथे शिक्षक म्हणुन रुजु झालो येथे गणित विषयाचा मुख्य प्राध्यापक म्हणून मि नियुक्त झालो. येथे माझ्या हातुन अनेक विद्यार्थी घडले . मोठे अधिकारी घडले मला अभिमान वाटतो मी अनेक विद्यार्थ्याला घडु शकलो अनेक गोरगरिब विद्यार्थ्याचे भविष्य बदलु शकलो माझ्याकडे काय आहे तर ? हाच गरीब विद्यार्थ्याचा आशिर्वाद आहे म्हणून मी घडु शकलो आणि स्वतःला बदलु शकलो सांगताना मला अभिमान वाटतो ज्या गावात माझ्या आई वडीलांना राहायला साधे घर पण नव्हते आज माझे अहिल्यानगर सारख्या पण मोठ्या शहरात मी स्वतःचे घर घेतले सांगायचे एकच की संघर्ष कुर्बानी मागतो म्हणुन जीवनात येणाऱ्या संकटांना सकारात्मकतेने पाहिले तर त्यावर मात करता येते म्हणून प्रयत्न करणे सोडु नये*
# प्रा. अंबादास पाराजी रूपनर (गरुडझेप ॲकडमी)
मी जवळून पाहिलेले रूपनर सर
लेखक - अमोल रूपनर
Comments
Post a Comment