रुपनरवाडीची ओळख जिल्ह्याच्या नकाशावर करून देण्यात प्रा. गोविंद रुपनर सरांचा सिंहाचा वाटा .

प्रा. गोविंद रुपनर सर हे अहमदनगर जिल्हा परीषदेचे शिक्षक आहेत. २००५ साली ते शिक्षक  पदावर रुजु झाल्यापासुन आजपर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आपल्या संस्काराचे आणि शिक्षणाचे  बाळकडू पाजत राष्ट्रनिर्माणासाठी घडवले. व घडवत आहेत . 
         त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उत्कृष्टपणे यशस्वीरित्या सेवा  देत आहेत.
        रुपनर सरांचा स्वभाव पहिल्यापासुनच सेवावृत्तीचा असल्याने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजुन घेत त्यांना  प्रोत्साहन देत त्यांनी विद्यार्थ्यामध्ये लढण्यासाठी सकारात्मक उर्जा जागवली .
           रुपनर सरांनी  ग्रामिण भागातील   स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः पोलिस भरती करणाऱ्या मुलांना त्यांनी  पुस्तके , गोळाफेकची तयारी करणाऱ्यासाठी  गोळा आदि साहित्याची  वाटप  करत त्यांनी मुलांना प्रोत्साहन देत  त्यांची आर्थिक उणीव भरून काढली .
समाजातील निरक्षर लोकांची  तहसिल कार्यालय , सरकारी कार्यालयामध्ये दिशाभुल होऊ नये . यासाठी त्यांनी  वृद्ध ,अपंग  अशा समाज घटकांना विशेष मदतीचा हात दिला . व त्यांचे आर्थिक शोषण होऊ नये याची ते सातत्याने काळजी घेतात .
निसर्गाशी आणि समाजाशी बांधीलकी राखत त्यांनी अनेकदा वृक्षारोपण केले . 
 या सर्व कामाची दखल घेत माऊली ट्रस्ट उस्मानाबाद यांच्यावतीने  २०१४ साली त्यांना आदर्श  शिक्षक पुरष्काराने सन्मानित करण्यात आले.
            
जे का रंजले गांजले .
त्याशी म्हणे जो आपुले
तोची साधु ओळखावा
देव तेथेची जाणावा .
या पंक्ती आपल्या जीवनाशी तंतोतंत जुळतात .

अशा आदर्श शिक्षकाच्या ऋणातुन समाजाला व राष्ट्राला मुक्त  होणे शक्य नाही .
रुपनर सर आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे .
      आपल्या कर्तुत्वाला माझ्या हृदयातुन सलाम !

Comments