भावनिक साद घालुन मुलाने आईला लिहीलेले पत्र .

हे बघ आई मी तुझ्याबरोबर बोलत नाही म्हणजे मी तुमच्यावर रागावलो अस नाहीं , अन् मला माहीत आहे तु पण माझ्यावर रागावणार पण नाहिस कारण तु माझी आई आहेस . 
हे बघ तु माझ्यावर नाराज होऊ नकोस , माझ्यावर पुत्रशोक पण करू नकोस , कारण मला याच्या फार यातना होतात ,
आणि माझी चिंता पण करू नकोस ! त्याला पाहण्याची इच्छा पण करू नकोस कारण तुझा मुलगा फार सुखी आहे . 
 
मला पण माहित आहे मुलांसाठी आईचा जीव किती तुटतो , पण माझी काही काळजी करू नकोस . 
  
     कारण तुझा मुलगा कधीच वाईट पाऊल टाकणार नाही , तुझ्या मुलावर विश्वास ठेव . तो इतका चारीत्र्यवान आहे त्याची इतरांशी तुलना करणे फारच कठीण आहे .तुझ्या मुलाची बिलकुल पण काळजी करू नकोस ; कारण त्याने जीवाला जीव देणारी माणस कमावलीत .

   तुच माझी काळजी घेते अस काय नाही रे आई माझी बहीण शोभा तुझ्याप्रमाणेच माझी काळजी घेते .


     मी नेहमी घराबाहेर पडल्याबरोबर माझे जीवन परमपिता परमेश्वराच्या च्या जीवावर सोडत असतो तोच माझा सखा आहे . तो परमेश्वर पण माझी काळजी घेतो . बाहेर असल्यावर तोच माझी सर्व नाती पुरवतो , दयाळु देव मला काहीच कमी पडून देत नाही . कारण त्याचा माझ्यावर फार जीव आहे. आता माझ्या दुःखा सुखाचा वाटेदार तोच दयाळु परमेश्वरच आहे . तो माझी फार काळजी करीत असतो म्हणून तु त्या परमपिता परमेश्वराचे आभार मानीत जा ; त्याला नेहमी धन्यवाद देत जा , तो माझी फारच काळजी करतोय , जगाच्या पाठीवर माझ्यावर प्रेम करणारा तोच आहे . 
त्या दयाळु देवावर कधीच नाराज होत जाऊ नकोस ; कारण तोच माझी काळजी करतोय ; तो माझी काळजी करतोय म्हणुन तुझ्या मुलासाठी त्याला धन्यवाद दे त्याचे हृदयापासुन आभार मानीत जा . तो फार दयाळु आहे . परमेश्वराने माझी वेळोवेळी तुमच्या प्रमाणेच काळजी घेतली . म्हणुनच मी जीवनभर त्या परमपिता परमेश्वराचा आभारी राहील . 
तुमचा पण मी ऋणी आहे , तुझ्या म्हातारपणाची काठीचा आधार मी आहे , म्हणून काही काळजी घेऊ नकोस , तुझ्या मुलाला माफ कर आणि भरभरून तुझे त्याला आशिर्वाद असुदे ,
तुझ्या अशिर्वादच तुझ्या मुलाला काही कमी पडु देणार नाहित . याची मला खात्री आहे . 

आयुष्यात नेहमी कृपाळु परमेश्वराचे आभारी राहा 





आई तुझाच प्रिय ......

Comments