समान नागरी कायदा काळाची गरज !

आज २१ व्या शतकात  विज्ञान युगात भारतात आजही गुणवत्ते ऐवजी  जातीला प्राधान्य दिले . हा आपल्या राष्ट्राच्या प्रगतीमधील काळा डाग म्हणने ही अतियोशक्ती ठरणार नाही . आज भारताच्या संविधानामध्ये देशाला धर्मनिरपेक्ष , जातीनिरपेक्ष देश म्हणून घोषीत केले . परंतु आज सद्यपरीस्थीतीवर डोकावून पाहिल तर आज सरकारमध्येच  जातीय आरक्षण राखीव आहे . 
           जातीय  आरक्षणाच मुळ जातीयवादी , भ्रष्ट पुढारी आहेत , कारण यांना जातीच्या नावाने राजकारण  करता याव  . जणु यांनी जातीचा ठेका घेतलाय ! हेच जातीयवादी नेते समाजाला भडकावतात  . दोन समाजामध्ये द्वेष पसरवतात , या नेत्याकडे युवावर्ग आकर्षीत होतो , यामध्ये फक्त तरुणाचा वापर केला जातो  , त्यांच्या उज्वल भविष्याची या गद्दारांना काहीच चिंता नसते . फक्त आपली पोळी भाजुन घेणे हाच त्यांचा उद्देश असतो . ना यांना देशाच्या तरुणाच्या उत्वल भविष्याची चिंता ना आम्ही कुठेतरी देशद्रोही कृत्याची ! 
               जर समान नागरी कायदा लागु झाला तर  यांची दुकाने बंद होतील पण सत्तेत हीच नालायक !
           राष्ट्राला महासत्ता बनवण्याचे स्वप्न आम्ही पाहतो पण  आम्ही गुणवत्तेला नव्हे तर जातीला प्राधान्या देतो हे कुठवर चालणार आज देशाला स्वातंत्र होवून 74 -75 वर्ष झाली तरी ही आजपण जातिच्या  आधारे नोकरभरतीला प्राधान्य दिले जाते . अशाने उच्चवर्णीय  तरुणांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यांना पण वाटु लागले आहे की आपली मेहनत वाया जात आहे . पण या तरुणांनी त्या जातीला दोष न देता राज्यकर्त्यांना जबाबदार धरावे . 
        जातीय दंगलीचे मुळ जातीय आरक्षण आहे . होय भारत स्वातंत्र झाला त्यावेळी दलीतांना आरक्षण फार जरुरीचे होते . त्यावेळी आमचा बंधु दलीत समाज कुठे तरी मागे होता पण आज मुळीच  आरक्षणाची गरज नाही आज खऱ्या  अर्थाने भारतामध्ये समान नागरी कायदा लागु व्हायला हवा ही प्रत्येक देशभक्ताची इच्छा आहे .
              समान नागरी कायदा लागु झाला तर देशामध्ये गद्दार नेत्याची दुकाने फार दिवस चालणार नाहीत . देशात खऱ्या अर्थाने गुणवत्तेला प्राधान्य दिले तर . राष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराला आळा बसेल , सरकारी कामातही मोठा बदल होईल , लाच मागणारे फार कमी होतील . आळशी कर्मचारी पण कमी होतील , सरकारी कार्यालये स्वच्छ दिसतील , फाईल पेंडीग हा प्रकार ही पाहायला भेटणार नाही . गुणवतेच्या आधारे निवडले गेलेले कर्मचारी पुढार्यांना धारेवर पुढार्यांच्या  भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवतील . खऱ्या अर्थाने राष्ट्र महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही .

Comments