ज्यांच्या जीवावर टेलीकॉम कंपन्या करोडो रुपये नफा कमावतात , असा हक्कापासुन वंचीत कामगार वर्ग ज्यांच्या आरोग्याकडे सर्रास दुर्लक्ष्य केल जात .... !
देशात पडद्याच्या आडून देशसेवा करणारा कामगार वर्ग म्हणजे टेलीकॉम कामगार वर्ग होय जो कामगार आपले मोबाईल नेटवर्क सुरळीत चालण्यासाठी आपल्या दुखांना बाजुला ठेवून अहोरात्र झटत असतो आज मोबाईल हा प्रत्यकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय ! त्यांच्या अनेक समस्या असुन सुद्धा टेलीकॉम कामगार आपली सेवा चोखपणे बजावत असतात
आज खरेतर या कामगाराची एकही राज्यव्यापी संघटना नाही , त्यामुळे या कामगार वर्गावर कामगारावर कायमच अन्याय अत्याचार झालेत . या कामगारांना अनेकदा फार स्थानिक समस्यांना तोंड द्यावे लागते . टेलीकॉम कंपन्याचे केबल वाचवण्यासाठी अनेकदा या कामगारांना हाणमार झाली आहे . अनेकदा काही समाजकटकाकडून केबल तोडले जाते अशावेळी या कामगारांना रात्री अपरात्री ते जोडण्यासाठी कामावर जावे लागत असते .
दिवसरात्र कामामुळे या कामगाराच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत . त्यामुळे या कामगारांना अनेक प्रकारच्या शारारीक व्याधीला सामोरे जावे लागत आहे . अशा जीकीराच्या परीस्थीतीमध्ये ही हा प्रामाणिक कामगार वर्ग आपली सेवा देत असतो यामुळे टेलीकॉम कंपन्या सर्रासपणे याकडे दुर्लक्ष्
करीत आहेत त्यामुळे या कामगाराची संघटना बनवणे फार महत्वाचे आहे . की ज्यामुळे या कामगारावर अन्याय होणार नाही
त्यामुळे टेलीकॉम कंपन्यानी याकडे लक्ष्य घालावे .
Comments
Post a Comment