सच्चा देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाष चंद्र बोस .

नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी पूर्वीचा बंगाल प्रांत आणि सध्याचे ओडिशा राज्यांमधील कटक येथे झाला त्यांचे वडील जानकीदास बोस व आई प्रभावती देवी या दापत्याच्य। पोटी झाला आज त्यांची जयंती
 .
नेताजींच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी कलेक्टर बनावे त्यामुळे नेताजी लंडन येथे आयसीएस परीक्षेची तयारी करण्यासाठी गेले आणि ते परिक्षा ही पास झाले आणि आयसिएस परीक्षा पास होणारे पहिले भारतीय ठरले .
देश गुलामीत असताना आपण नोकरी करावी हे त्यांच्या मनाला लाजीरवाणे वाटू लागले . सर्व काही चांगले चालले असताना त्यांना देशभक्ती झोप येऊ देत नव्हती त्यामुळे 22 एप्रिल 1921 रोजी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण जीवन भारत मातेला समर्पित करण्याचा संकल्प केला .
त्यांनी भारतीयांना आवाहन केले तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा '

नेताजींनी विदेशात जाऊन तेथील भारतीयांना संघटित करून आझाद हिंद फौजेची स्थापना केली व तिचे नेतृत्व रासबिहारी बोस यांच्याकडे दिली व महिलांसाठी झाशीची राणी रेजिमेंट स्थापन केले व तिथे नेतृत्व लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे दिले .आझाद हिंद फौजेचे ब्रीद वाक्य चलो दिल्ली असे होते व नारा जयहिंद असा होता 
.
सन 1942 रोजी इंग्लंड दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेले असताना नेताजींच्या मते आपण देशामध्ये भारतीयांनी स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र करावी अशी नेताजींची इच्छा होती . नेताजींनी आपल्या आझाद हिंद फौजेच्या पराक्रमाने व जपानच्या साह्याने आजचे अंदमान व निकोबार बेटे जिंकून घेतली व त्यांना शहीद व स्वराज्य अशी नावे दिली पुढे आजाद हिंद फौजांनी इम्फाल पर्यंत धडक मारली .
18 ऑगस्ट 1945 रोजी तायवान मध्ये नेताजींचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे सांगितले जाते . परंतु त्यांचा मृत्यू एक रहस्यच बनून गेले . आज पर्यंत काँग्रेस सरकारने नेताजींच्या मृत्युच्या फाईली सार्वजनिक केल्या नाहीत . आणि नेताजींच्या वीरतेचा इतिहास आम्हा भारतीया पासून लपवला जात आहे आजपर्यंत नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उलगडू शकले नाही हे फार मोठी शोकांतिका आहे 

अशा या वीर ' शुर 'पराक्रमी महापुरूषास शत शत नमन विनम्र अभिवादन ! 
नेताजी आपण पुन्हा जन्म घ्या आणि या भारत मातेचे स्वप्न साकार करा 

जय हिंद

Comments