माणुसकीच्या शब्दकोषातुन काळाआड गेलाय विश्वास

आज विश्वास नावाचा शब्द काळाआड  गेलाय याच विश्वासाला तडा गेल्याने आज नाती संपुष्टात आलीत. ज्या दिवशी घराला कुलुप लागली  त्याच दिवशी विश्वासाने माणुसकीची परीसिमा  ओलांडली.
        आज ही माणसात माणुसकी शिल्लक आहे . मात्र विश्वास नसल्याने माणुसकीच संपलीय आणि मानसात संशयी वृत्तीला बळ मिळालय . संशयी वृत्तीच्या तुलनेत आज विश्वास कुठे तरी हारलेला दिसतोय .  विश्वास संपल्याने माणसातील अहंकार जागा झालाय. कशाला हवाय माणसामध्ये अहंकार?  
वास्ताविक जीवनाकडे पाहिल तरआजच्या  धकाधकीच्या जीवनात माणसाचा अंत कधी  होईल हे पण सांगता येत नाही. 
          आम्हाला मृत्युचा विसर पडल्याने तर आमच्यामधील  अहंकार जागा झाला नसेल ना ! याचा प्रत्येक माणसाने विचार करणे गरजेचे आहे. 
आम्ही जन्माला आलो म्हणजे या सृष्टीचे मालक व्हायला नाही आलो . याचे मंथन करणे गरजेचे वाटतेय.
    २०१९ - २० च्या कोरोना संकटामध्ये बापाच्या अंत्यविधीला पण पोटच्या मुलाला हजर राहता आले नाही. त्याचा अंत्यविधी रुग्नालयातील  कर्मचाऱ्यांनाच करावा लागला त्याचे अंत्यसंस्कार करावे लागले हे वास्तव आपण पाहिलय. यातुन आपण काय शिकायच . ते आपणच ठरवा .
      आपल्यामधील अहंकार , स्वार्थ,मी पणा , संशयीवृत्ती याच गोष्टीने विश्वास  संपवलाय
विश्वास संपल्याने नात्यामधे दुरावा वाढला. कारण विश्वास ठेवण्याच्या लायकीची माणसच आज शिल्लक राहिली नाहीत. असली ती पण अगदी थोडीच !
        जीवन सुखमय करायचे असेल तर अहंकार आणि संशयाचा त्याग करा आणि हृदयातुन एकमेकावर विश्वास ठेवा नाती नक्कीच जोडली जातील आणि घट्ट होतील याच पक्क्या विश्वासाने  जीवन आनंदमय होईल.

Comments